बागल गटामुळे भाजपाला अच्छे दिन ; शुन्यातुन सत्तेकडे वाटचाल
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बागल गटाने बीजेपी प्रवेश केल्यापासून बीजेपीला अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. त्यापूर्वी नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अपेक्षित असं यश तर नव्हतंच शिवाय केवळ एखादा उमेदवार नगरपरिषदेत वगळता त्या ठिकाणी बीजेपीचे आव्हान ही कधी दिसून आलेले नव्हते. परंतु बागल यांनी प्रवेश केल्यापासून तालुक्यात बीजेपीचे अच्छे दिन आले असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच प्रत्येय नुकत्याच झालेल्या तीनही निवडणुकात आलेला आहे.

तालुक्यात बागल गट मागील तीन निवडणुकांपासून विधानसभेच्या पटलावर सत्तेत नसतानाही बागल गटाने आजही आपली ग्रामीण भागात असलेली नाळ कायम ठेवलेली असल्याचे दिसून येत आहे. मुळातच तालुका पातळीवर एखादी सत्ता नसताना याशिवाय जवळची व निकटवर्तीय असलेले खंबीर असे कार्यकर्ते विरोधी गटात केल्यानंतरही बागलगट अजूनही आहे. तसाच तग धरून असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे केवळ चर्चेपुरता नाही तर बागल गटाचे पदाधिकारी ही विविध क्षेत्रात निवडणुकीला सामोरे जाऊन जनतेतून निवडणूक जिंकत आहेत. हे या बाबी अधोरेखित कराव्या लागतील.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना तसेच मकाई सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याचे खापर कायमच बागल गटावर फोडण्यात आलेले होते. त्याचा प्रभाव विधानसभा निवडणूकीवर पडलेला दिसला आहे. परंतु त्यातूनही लोकांचा विश्वास आजही त्यांच्यावर कायम असल्याचे यातून दिसत आहे. मागील पंधरा वर्षांपासून बागल गटाला विधानसभेच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी स्थानिक निवडणुकांमध्ये मात्र आजही बागल गटाचा बोलबाला असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात लोकसभा तसेच विधानसभेला भाजपा सह युती विरोधी लाट पाहायला मिळाली होती. तर आजही ग्रामीण भागातील मतदार भाजपाकडे पूर्ण ताकदीने आकर्षित झालेला दिसत नाही. परंतु गटातटाच्या राजकारणात भाजपाकडे तसेच युतीकडे मात्तबर नेते असल्यामुळे सध्या युती मधील घटक पक्षांना अच्छे दिन आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बागलांच्या प्रवेशानंतर भाजपात सुधारणा झालेली दिसून आली.
करमाळा नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये बागलांच्या नेतृत्वाखाली भाजपा मैदानात उतरलेली होती. या निवडणुकीत भाजपाचा केवळ एक सदस्य निवडणूक जिंकून नगरपरिषदेवर गेलेला होता. परंतु बागल यांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर या ठिकाणी भाजपाचे सात नगरसेवक निवडून आलेच शिवाय उपनगराध्यक्षपदी ही भाजप विराजमान असल्याचे दिसून आले.
त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिथे एकही सदस्य निवडणुक जिंकला नव्हता तिथे बागल शिंदेंच्या माध्यमातून भाजपा व राष्ट्रवादी एकत्रित लढली. त्या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपाला दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागा जिंकता आल्या तर भाजपा सोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन व पंचायत समितीच्या चार अशा जागा जिंकून आलेल्या दिसून आल्या. त्यामुळे बागलांचा दबदबा स्थानिक निवडणुका दिसून येत असल्याचे दिसत आहे.

