शिंदे गटाचे समर्थक सरपंचाच्या सुनेचा माहेरी दोन जागेंवर पराभव ; एका जागेवर मतदारांची तर दुसरीकडे नशीबाची हुलकावणी
करमाळा समाचार –
विहाळ ग्रामपंचायत निवडणूक मध्ये प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक तीन मध्ये पॅनल प्रमुख माजी सरपंच दयानंद मारकड यांची मुलगी व आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक लव्हेचे सरपंच विलास पाटील सुन (सौ.प्रतीक्षा चैतन्य पाटील) प्रतीक्षा दयानंद मारकड यांचा विहाळ ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक तीन अशा दोन्ही जागेवरती पराभव झाला आहे. एका ठिकाणी मतदारांनी संधी दिली नाहीतर दुसऱ्या वार्डात झालेल्या मतमोजणीत नशीबाने संधी हिरावली.

प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रतीक्षा मार्केट यांचा पराभव प्रदीप हाके यांनी 70 मतानी केला. तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रतीक्षा मारकड यांचा पराभव रेश्मा देवकते यांनी केला. प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रतीक्षा मारकड व रेश्मा देवकते यांना 211- 211 अशी समान मते पडली. चिट्टी द्वारे रेश्मा देवकते यांचा विजय घोषित करण्यात आले.

येथे माजी आमदार नारायण पाटील गटाचे सरपंच पदाच्या उमेदवार पूजा मोहन मारकड या 59 मताने विजयी झाले आहेत. आमदार पाटील गटाचे सहा तर विरोधी गटाचे तीन ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत.