करमाळासोलापूर जिल्हा

विलासची घणाघाती फलंदाजी आणी सुशांतची भेदक गोलंदाजीच्या जोरावर शिवक्रांतीची युवा ब्रिगेड विजयी ; तालुक्यातील प्रमुख क्रिकेट संघाचा पराभव करीत विजय

करमाळा समाचार

करमाळ्यातील प्रमुख संघांचा क्रिकेट सामन्यात पराभव करीत शिवक्रांती संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावले आहे. रविवारी प्रमुख आठ संघांची एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा रविवारी जीन मैदान येथे पार पडली. कुंभेज येथील क्रांतिवीर क्रिकेट संघाचा दोन धावांनी पराभव करीत करमाळ्याचा शिवक्रांती संघ विजेता ठरला आहे . एक दिवसीय मालिकेत रोमांचक असे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

तालुक्यातील प्रमुख आठ संघांना आमंत्रित करत गजानन स्पोर्ट क्लब यांच्या वतीने एक दिवसीय बाद फेरीतील सामने आयोजित केले होते. यावेळी शिवक्रांती व क्रांतिवीर कुंभेज या संघांमध्ये अंतिम सामना खेळण्यात आला. यामध्ये शिवक्रांती संघाने कुंभेज संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव करीत अंतिम सामना आपल्या खिशामध्ये घातला. त्यामुळे शिवक्रांती प्रथम १० हजार, क्रांतिवीर द्वितीय ५ हजार तर गजानन व वांगी (क्रमांक ३) ३ हजार या संघांना विभागून तृतीय पारितोषिक देण्यात आले.

केवळ आठ संघांचा सहभाग असलेली ही मालिका रोमांचक व अटीतटीच्या सामन्यांमुळे प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात यशस्वी ठरली. या मालिकेत गोलंदाजाची हॅट्रिक तर सुपर ओव्हर सारखे रोमांचक लढत ही पाहायला मिळाली. उत्कृष्ट फलंदाज म्हणून विलास धायतोंडे तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुशील पवार दोन्हीही शिवक्रांती संघाच्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धा गजानन स्पोर्ट क्लब यांच्या वतीने आयोजीत केली होती यावेळी अमित बुदृक, बापु सावंत, विकास भडंगे, रितेश कांबळे यांच्यासह सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE