करमाळासोलापूर जिल्हा

उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याचे सांगत आ. शिंदेंचे स्पष्टीकरण

समाचार टीम 

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व राजन पाटील यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिंदे ही भाजपा जातात का काय अशा चर्चांना उधाण आले होते. पण या सर्व चर्चांना शिंदे यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला आहे. मागील काही दिवसांपासून राजन पाटील हे बीजेपी जाणार असल्याबाबत चर्चा होत्या. तर आजच्या भेटीमुळे प्रवेश दोघेही करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

याबाबत बोलताना बबनदादा शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, मागील बऱ्याच दिवसापासून आम्ही एकत्र काम करत आलो आहोत. तर देवेंद्र फडणवीस सध्या उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही दिल्लीत एका कामानिमित्त गेलो असताना फडवणीस साहेब एका हॉलमध्ये बसले असल्याची माहिती मिळाली. यावेळी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र काम करत असल्यामुळे सदरची भेट घेतली होती. मी सध्या राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार असून भाजप प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्टीकरण बबन दादा शिंदे यांनी दिले आहे.

politics

बबनराव शिंदे हे माढाचे आमदार असून मागील विधानसभेपूर्वीच ते भाजपाशी जवळी करून प्रवेश करतील का काय अशा चर्चा सुरू होत्या. पण त्यावेळी त्यांनी प्रवेश न करता राष्ट्रवादीतूनच विधानसभा लढवत विधानसभा विजयी झाले होते. त्यानंतर त्यांचेच बंधू अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे करमाळ्यातून निवडून आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी बीजेपीला पाठिंबा दिलेला होता. पण आता ते राष्ट्रवादीसोबत ठाम आहेत. बबन दादांनी आजच्या भेटीनंतर चर्चेना उधाण आले होते. परंतु ते आता चर्चा थांबल्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group