राजुरीत शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर
करमाळा – संजय साखरे
राजुरी ता करमाळा येथे आज सकाळी शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ० ते १८ वयोगटातील एकूण ४८९ मुलामुलींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी dr रविंद शिंदे यांनी सर्व मुलांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये जुलाब,उलटी,ताप यावर गोळ्या देण्यात आल्या. आवश्यक असणाऱ्या मुलांना टॉनिक चे वाटप करण्यात आले.
हिमोग्लोबिन गोळ्या चे ही वाटप करण्यात आले. यामध्ये माध्यमिक विभागाच्या २३४ व प्राथमिक शाळेच्या १५९ व अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी श्री राजेश्वर विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री अनिल झोळ सर,प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री मोरे सर,सरपंच ड्रा अमोल दूरंडे,सर्व शिक्षक वृंद ,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स उपस्थित होते.
