करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शाळेत सन्मान

करमाळा समाचार

विठामाई माध्यमिक विद्यालय गुळसडी येथे MPSC स्पर्धा परीक्षा मध्ये PSI पदी निवड झाल्याबद्दल माजी विद्यार्थीनी कु. विद्या किसनराव कळसे व SRPF मध्ये निवड झाल्याबद्दल मल्हारी लोंढे, तसेच ईयत्ता 10 वी प्रथम, द्वितीय व त्रितीय क्रमांक आलेल्या अनुक्रमे भक्ती भालचंद्र पाटील, आकांक्षा बिभीशन ढमढेरे व शिवानी सोमनाथ खरात यागुणवंत विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सिंधूताई माई नारायण खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी संस्था सचिव मानसिंग भैय्या खंडागळे, सरपंच प्रमोद भंडारे, आदम भाई शेख, दादासाहेब कांबळे, ग्रामसेवक बडे भाऊसाहेब, किसनराव कळसे, धनंजय कळसे संतोष कळसे आदी ग्रामस्थ तथा प्रशालेचे मुख्याध्यापक एस. एम. शिंदे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सत्काराला उत्तराथ नूतन PSI व माजी विद्यार्थीनी कु. विद्या किसनराव कळसे यांनी आपले मार्गदर्शन पार मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव मानसिंग भैय्या खंडागळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रस्तावीक मुख्याध्यापक एस. एम. शिंदे सर यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनवणे सर यांनी केले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE