करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाळु उपश्यातील फरार मुख्यसुत्रधारास करमाळा पोलिसांकडुन अटक

करमाळा समाचार

सीना नदीच्या पात्रातून तरडगाव परिसरात वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारास करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर त्यातील मुख्य सूत्रधार फरार होता. त्याला रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलिसांनी केले आहे. सदरची कारवाई पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मारुती रणदिवे व पोलिस नाईक बालाजी घोरपडे यांनी कारवाई केली आहे.

तरडगाव येथून वाळू उपसा करत असल्याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात ५ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी संबंधित लोकांकडून एक ट्रॅक्टर व वाळू ने भरलेली डम्पिंग ट्रैली जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी तीन संशयतांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये तुषार मोटे रा. जवळा व सतीश शिर्के रा. फंड गल्ली करमाळा यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर ऋषिकेश उर्फ बबलू पाटील वय 32 तरडगाव हा प्रमुख सूत्रधार पोलिसांपासून फरार होता त्याला रात्री पकडण्यात आले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE