विद्यापीठाचे पेपर सुरु असताना स्कॉड दाखल ; ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना काढले बाहेर
करमाळा –
अहिल्यादेवी होळकर (सोलापूर ) विद्यापीठाची सध्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने विज्ञान विभागाचे मायक्रोबायोलॉजी व कला शाखेचा सहकार असा आजचा पेपर चा विषय होता. त्यावर पेपर सुरू असताना देखरेख करणारे पथक (स्कॉड ) यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दाखल झाले.

त्यांनी सदर पेपर सुरू असताना जवळपास 75 ते 100 मुलांना संशयित आढळले. त्यावेळी त्यांना वर्ग बाहेर काढले आहे. तर त्या मुलांना शेवटचा पंधरा मिनिटांचा पेपर देऊ शकले नाहीत.

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेले या परीक्षेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या केंद्रामध्ये अचानक देखरेख करणाऱ्या पथकाने भेट दिली. यावेळी काही विद्यार्थी आक्षेपार्ह कृती करताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुलासह मुलींचा समावेश आहे.
पेपरची वेळ संपण्यापूर्वी बरेचसे विद्यार्थी महाविद्यालयाच्या गेटवर येऊन थांबल्याने संबंधित विद्यार्थ्यांना रस्टिकेट केल्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती. परंतु महाविद्यालय व्यवस्थापनाने सदर प्रकार घडल्या नसल्याचे खुलासा केला आहे. केवळ समज देऊन घरी पाठवण्यात आले आहे. मुलांकडे काही टिपण आढळले होते त्यामुळे ही कारवाई झाली आहे.