महिण्याभरात दुसऱ्यांदा कडक लॉकडाऊन ; किराणा भाजी करावी लागणार घरपोहच डिलिव्हरी
सोलापूर – प्रतिनिधी
सोलापूर ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवार 21 मे ते 1जून या कालावधीत ग्रामीण भागातील किराणा साहित्य, भाजीपाला, दारू दुकाने बंद करण्याचा आधीच काढले आहेत.
कृषी क्षेत्राशी निगडित असलेले कृषी दुकाने व इतर सेवा सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहणार आहे. किराणा साहित्य भाजीपाला फळांची विक्री सकाळी सात ते अकरा या कालावधीत फक्त घरपोच सेवा देता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
ग्रामीण भागातील अंडी, मास, मटण विक्री दुकाने, हॉटेल, उपहारगृह, लॉज, रिसॉर्ट, मॉल मार्केट बंद राहील. दारू विक्री, बिअर शॉपी, देशी व विदेशी दुकाने बंद राहतील. सर्व बाजार समित्या आठवडे बाजार, ठोक व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने बंद राहतील. रस्त्याच्या कडेला असणारे फळविक्रेते फेरीवाले त्याचबरोबर प्रार्थना स्थळे, मंदिरे, चित्रपट हे नाट्य गृह, सभागृह, शाळा महाविद्यालय बंद राहतील.
केशकर्तनालय ब्युटी पार्लस या सर्व अस्थापना व दुकाने बंद करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.