बारावीत शिकणाऱ्या करमाळ्याच्या मल्लाची १२५ किलो वजनाच्या फ्रीस्टाइल कुस्तीसाठी निवड
करमाळा समाचार
न्यू इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्यु.काँलेज टाकळी(टें) ता.माढा या प्रशालेचा शालेय कुस्ती स्पर्धेत दबदबा कायम राहिला आहे. या शाळेत शिक्षण घेत असलेल्या करमाळ्याच्या मल्लाची१२५ किलो वजनाच्या फ्रीस्टाइल कुस्तीसाठी निवड करण्यात आली आहे.

आज दि.१२ डिसेंबर रोजी कै. गोदबा पाटील कुस्ती केंद्र खुडूस ता.माळशिरस येथे आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये टाकळी(टें) ज्यु.काँलेजचा विद्यार्थी पै.प्रेम संतोष जाधव इ.१२ वी सायन्स याची १९ वर्ष फ्रिस्टाईल १२५ किलो खुला गट या प्रकारातून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

तसेच पै.अक्षय पोपट घाडगे १२ वी ७९ किलो द्वितीय, पै.शुभम आप्पा आतकरे १२वी.६५ किलो द्वितीय, मुलींमधून कु.साक्षी राखुंडे द्वितीय, कु लक्षी रामा चव्हाण द्वितीय, सोनाली बुरुंगले द्वितीय, कु.मोनाली गायकवाड द्वितीय क्रमांक आले. वरिल सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमदादा शिंदे, प्राचार्य महादेव सुरवसे, क्रिडा शिक्षक भोसले, प्रा.चोरमले , आलदर सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच ग्रामस्थ टाकळी(टें)यांनी अभिनंदन केले तर करमाळ्याच्या मल्लाची निवड झालेने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.