वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयक पदी गणेश चव्हाण यांची निवड
जेऊर
तालुक्यातील शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या काही निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशा नुसार या निवडी करण्यात आल्या आहेत. यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या समन्वयक पदी गणेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून राज्यात आरोग्यसेवा केली जात आहेत. हजारो रुग्णांचे मोफत ऑपरेशन या कक्षाच्या माध्यमातून केले जात आहे. करमाळा तालुक्यातील देखील रुग्णांना फायदा मिळवा. म्हणून गणेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शिवसेना (शिंदे गट) महेश चिवटे यांनी बोलताना सांगितले आहे. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून वैद्यकीय कक्ष गेल्या काही वर्षांपासून कार्य करत आहे. आत्तापर्यंत हजारो रुग्णांना या कक्षाच्या माध्यमातून मोठी मदत मिळाली आहे. अनेक गरजुंची मोफत ऑपरेशन या कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. तालुक्यातील अशा प्रकारच्या कोणत्याही रुग्णाला उपचाराची गरज असेल आमच्याशी संपर्क साधावा, अशी प्रतिक्रिया नूतन समन्वयक गणेश चव्हाण यांनी बोलताना व्यक्त केली.