गिरीश रवींद्र कुमार पवळ याची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोगाव पश्चिमचा विद्यार्थी गिरीश रवींद्र कुमार पवळ याची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे. याच्या अगोदर गिरीश याची सैनिक स्कूल सातारा येथे निवड झाली आहे. तसेच स्कॉलरशिप मध्ये सुद्धा तो बसला आहे.

त्याच्या यशाबद्दल करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत व निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक सतीश उत्तम चिंदे सर त्याचे वर्गशिक्षक श्रीकांत मोरे सर, जगदाळे सर, गोडगे सर, पठाडे सर व सर्व शिक्षक स्टॉप तसेच शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र कुमार अशोक पवळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
