करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्रकरण एकच फिर्याद वेगवेगळ्या… खरे कोण बोलतय ?; भावकीचा वाद सात जणांवर गुन्हे दाखल

करमाळा समाचार 

तालुक्यातील पश्चिम सोगाव येथे अर्धा गुंठा जमीनीच्या वादातुन भावकीत वाद पहायला मिळाला यातुन दोन्ही बाजुच्या सात लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातुन मारहाण पण झाली यात सुदैवाने कोणतीही मोठी इजा किंवा जीवीतहानी झाली नाही. पण आता हा वाद पोलिस ठाण्यापर्यत पोहचला आहे. विशेष म्हणजे दोघांनी परस्परविरोधी आरोप केले आहेत. नेमके यात खरे कोण सांगत आहे हा तपास करुन पुढील कारवाई होईल. पण जमीनींसाठी असे भांडण किती दिवस चालणार हा प्रश्न कायम आहे. शिवाय खोटी फिर्याद देणाऱ्यावर पोलिस कारवाई झाली पाहिजे. जेव्हा अशा कारवाई सुरु होतेल तेव्हा नक्कीच खोट्या तक्रारी कमी होती.

पहिल्या फिर्यादी प्रमाणे ..
सामायिक जमिनीमधील तुमच्या नावावर असलेली अर्धा गुंठा आमच्या नावावर करा असे म्हणत डोळ्यात चटणी टाकून चौघांना मारहाण करण्यात आली आहे. सदरचा प्रकार सोगाव येथे 20 जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे अशी फिर्याद मंगेश गोडगे सध्या कळवा ईस्ट बालीनगर मुंबई यांनी दिली आहे.

या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मण गोडगे, भरत गोडगे, आशाबाई गोडगे सर्व रा. पश्चिम सोगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, 20 जून रोजी दुपारी दोन वाजता सामायिक जागेत तार कंपाउंड मारत असताना चुलत भावाला थांबवल्यानंतर त्यावेळी त्यांनी तुमच्या नावावर असलेला अर्धा गुंठा आमच्या नावावर करा असे म्हणाला त्यावेळी त्याला नकार दिल्यानंतर त्यांनी हातातील चटणी डोळ्यात टाकून मंगेश सह कुटुंबीयांना मारहाण केली आहे अशी फिर्याद दिली आहे.

तर दुसऱ्या फिर्यादी प्रमाणे …
सोगाव पश्चिम येथे चुलत भाऊ व कुटुंबीय मुंबईहून आले व सामायिक जागेत कंपाउंड घेण्यासाठी खड्डा खोदु लागले. यावेळी चारचौघात ठरल्याप्रमाणे करा असे म्हणालो असता उलट त्यांनी दमदाटी करून मारहाण केली अशी तक्रार लक्ष्मण गोडगे पश्चिम सोगाव यांनी दिली आहे.

याप्रकरणी पोपट गोडगे, महेश गोडगे, मंगेश गोडगे, गंगुबाई गोडगे रा. कळवा मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 20 जून रोजी दुपारी दोन वाजता लक्ष्मण गोडगे कुटुंबीयांसह सामायिक जागेत बसले होते. यावेळी मुंबईहून आलेले चुलत भाऊ व कुटुंबीय चार चाकी गाडीतून उतरली व चुलते पोपट यांच्या नावावर असलेल्या जागेत तार कंपाऊंड घेण्यासाठी खड्डे खोदायला लागल्यावर लक्ष्मण गोडगे यांनी त्यांना सांगितले लोकांना मध्यस्थी घेऊन आपले मिटलेले आहे. त्याप्रमाणे तुम्ही वागा दोन गुंठे सामायिक मधील तुमच्या नावाचा अर्धा गुंठा माझ्या वडिलांच्या नावे करा असे सांगितले. त्यावेळी तुम्हीच ठरल्याप्रमाणे वागा तुमच्या नावावर करीत नाही असे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्क्या, लाकडी काठीने मारहाण केली आहे. याबद्दल सदरचा गुन्हा दाखल झाला आहे.

– एकाच दिवशी घडलेल्या प्रकारात एक खोटे बोलत आहे का दोघे खोटे बोलुन आपली बाजु रेटत आहेत हा तपासाचा भाग आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE