एटीएम फोडणाऱ्या टोळीतील संशयीतांना सात दिवसाची पोलिस कोठडी
करमाळा समाचार
रविवारी एटीएम फोडून पळून जाणाऱ्या तीन संशयीत आरोपींना आयशर टेम्पो सहित गॅस कटर व इतर साहीत्य पकडण्यात सांगलीच्या विटा पोलीस ठाण्यातील पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई पूर्ण करून संशयित आरोपींना करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर त्यांना करमाळा न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून तब्बल 13 लाख 64 हजार रुपये घेऊन संशयित चोर पळून गेले होते. आत्ता केवळ चोरी करण्यात उपयोगात येणारे साहित्य असलेला मुद्देमाल हाती लागला असून इतर संशयीत आरोपी व रकमेचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम एन जगदाळे हे करीत आहेत.

या प्रकरणात तीन आरोपींना पकडले असून त्यामध्ये सैफुल खान, निसियुम अहमद व हसन रहमत सर्व राहणार हरियाणा असे संशयीतांची नावे आहेत.