करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात एटीएम फोडुन पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात यश ; विटा पोलिसांची कारवाई

करमाळा समाचार

रविवारी एटीएम फोडून पळून जाणाऱ्या तीन संशयीत आरोपींना आयशर टेम्पो सहित गॅस कटर व इतर साहीत्यासह पकडण्यात सांगली जिल्हयातील विटा पोलीस ठाण्यातील पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई पूर्ण करून संशयित आरोपींना करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून तब्बल 13 लाख 64 हजार रुपये घेऊन संशयित पळून गेले होते. आत्ता चोरी साहित्याचा मुद्देमाल हाती लागला असून इतर संशयीत आरोपी व रकमेचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणात तीन आरोपींना पकडले असून त्यामध्ये सैफुल खान, निसियुम अहमद व हसन रहमत सर्व राहणार हरियाणा असे संशयीतांची नावे आहेत. सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम विटा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे शाखा सांगली, पोलीस निरीक्षक संतोष डोके, विटा पोलीस ठाणे व विशाल येळेकर पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष देशपांडे, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पदके वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आले होते. तर चोरी झाल्याची घटना व इतर माहिती सर्वत्र महाराष्ट्रभर पोलीस ठाण्यांना देण्यात आली होती. याच्या आधारे इतर पोलिसांनी आपापल्या भागात ग्रस्त वाढवली होती. त्या आधारे विटा जिल्हा सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असताना एक आयशर टेम्पो वर संशयाला त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो थांबला नाही.

पोलिसांनी पाठलाग करून त्याचा शोध घेतला यावेळी त्यांच्याकडे चोरीचे साहित्य मिळून आले आहे. अधिक माहिती घेतल्यानंतर करमाळ्यात चोरीची घटना व संशयकांनी दिलेली माहिती ही जुळू लागली. त्या आधारे सदरची चोरी करून पळाल्याची खात्री पटली. त्यानंतर संशितांना करमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE