नातीसोबत अत्याचार केलेल्या आजोबाला सात दिवसांची पोलिस कोठडी
करमाळा समाचार
भावकीतील नात्याने चुलत आजोबा असलेल्या ६० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन नाती वर अत्याचार केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या वृद्धास सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मागील दोन महिन्यांपूर्वी मे व जुन या दोन महिण्याच्या काळात सदरचा वृद्ध व्यक्ती गोड बोलून जवळ घेत असे तिच्याशी संबंध प्रस्थापित करत असे. सुरवातीला गोड बोलुन नंतर धमकी देत मुली सोबत संबंध करीत होता. दरम्यानच्या काळात मुलीला दिवस गेले. मुलीला पोटात त्रास होऊ लागल्याने तीला दवाखान्यात नेले. त्यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहीती करमाळा पोलिसांना कळवली त्यानंतर संशयीत वृद्धास करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.
