करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शिंदेसाहेब… मग त्यावेळी कुठल्या तोंडाने तीस दिवसांची मुदत मागितली होती ?

ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांच्या लेखणीतून  ..


मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदेसाहेब,काल दि.३१ ऑक्टोबर च्या दै. सकाळच्या पहिल्या पानावर ” झटकन निर्णय होऊ शकत नाही ” या मथळ्याखाली फोटोसाहित (ज्यात तुमच्या डाव्या अंगाला चंद्रकांत आणि उजव्या अंगाला दिलीप ही दोन पाटलं आहेत) तुमची बातमी प्रसिद्ध झालीय, म्हणून तुम्हाला सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर सवाल हा आहे की , मागितलेल्या मुदतीपेक्षा त्यावेळी मनोज जरांगे-पाटलांनी आणखी जादा दहा दिवस देऊन आणि ती चाळीस दिवसांची मुदत संपून काल वर सहा दिवस उलटलेले असताना आता चक्क, झटकन निर्णय होऊ शकत नाही ! हे नक्की कोणत्या तोंडाने बोलला आहात ?

अरेरे… आम्हा मराठयांना नाही वाटत की, या आधी महाराष्ट्राच्या इतिहासात तुमच्या इतका हतबल ,दुबळा आणि विशेष म्हणजे मराठा कुळात जन्माला आलेला, जो शिवरायांची शपथ घेऊन मी मराठयांना आरक्षण देणारच ! (अशी पोकळ, भंपक आणि वेळकाढू) भीमगर्जना करतो… असा दुतोंडया नव्हे त्रितोंडया (तीन पक्ष) मुख्यमंत्री दुसरा कुणी झाला असेल ! नाथाजीराव, नुसती दाढी वाढवून आणि पोकळ गप्पा मारून कुणी ‘ जाणता राजा ‘ होत नसतं तेथे लागतात खरे जातिवंतच… मनोज जरांगेसारखे… अपने कौमके लिये मर-मिटने पर तैयार हुये पाक खुन वाले ! जाऊद्या…
तुम्हाला सांगून काय उपयोग आहे म्हणा? तुम्ही तर सत्तेसाठी वाट्टेल ते करणारे लाचार भडगुंजे… त्यामुळं तुमचं शेपूट आणि असलेली तोंडं त्यांच्या हातात !

मराठा भावांनो, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की महाराष्टात मराठा समाज ३२ टक्के आहे वगैरे हे सब झूट आहे हे लक्षात ठेवा, हे सगळं आजवरच्या राज्यकर्त्यांकडून (यात सिंहाचा वाटा आपल्याच जातभाईंचा) केवळ आपल्या समाजाला भासवलं-दाखवलं गेलंय आणि ते यासाठी आपला समाज वरचढ होऊ नये म्हणून ! मी अभ्यासपूर्वक सांगतो की महाराष्ट्रात आपला टक्का जवळपास ४०-४१ इतका आहे, आणि आपण गेली शेकडो नव्हे तर हजारो वर्षे या महाभूमीचे भूमिपुत्र आहोत. शिवरायांचं मूळ राजस्थानातल्या सिसोदिया या राजपूत वंशात असल्याचं सर्वश्रुत आहे, ते खरंही आहे. तिथल्या प्रतिकूल नैसर्गिक अवस्थेमुळे शेकडो वर्षांपूर्वी स्थलांतरीत झालेला समाज… ज्याच्या करारी-धाडसी वृत्तीमुळे मरहट्टे या (मरेंगे मगर हटेंगे नहीं) या शब्दाचा पुढे मराठा हा आणि कालांतराने मरहट्टयांची भूमी म्हणून महाराष्ट्र हे नाव रुढ झाले आणि तेदेखील शिवरायांच्या जन्मापूर्वी… हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कोणी काही म्हणत असेल पण शिवकाळात जाती-धर्मभेद नव्हता. शिवरायांनी लायकी, कर्तृत्वानुसारच सर्वांना वागणूक दिली आणि जगातले सर्वात पहिले लोकाभिमुख लोकशाही राज्य स्थापन केले हा इतिहास कोणीच नाकारू शकत नाही.

शिवराय जन्मले म्हणूनच पुढे फुले-शाहू-आंबेडकर आदी अनेक महापुरुष, द्रष्टे नेते जन्माला आले आणि शिवरायांच्या प्रेरणेमुळेच पुढच्या काळात राष्ट्रवाद ही भावना जन्माला आली आणि त्यातूनच आज असलेल्या भारताची निर्मिती झाली हे वास्तव कोणी नाकारू शकेल काय ?

हे इतकं या ठिकाणी नमूद करण्याचं कारण इतकंच की या महाराष्ट्रात कोण युरेशियातून, कोण कर्नाटकातून, कोण गुजरात, बिहार, आंध्र वा अजून कोठून आलं आणि येत आहे हे शेकडो वर्षांपासून ते आजवर कधीही मराठा समाजानं पाहिलेलं नाही, कधी दुजाभाव-मत्सर केला नाही, अन्य जाती-धर्मियांना थोरल्या भावाच्या भूमिकेतून सदासर्वकाळ कवेतच घेतलं ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर पुढील काळात केवळ राजकीय सोयीसाठी ‘ बजाव पुंगी हटाव लुंगी, खळ-खट्याक ‘ असल्या अनेक राजकीय नौटंक्या या समाजाने सोशिकपणे पाहिल्या, अनुभवल्या आणि भोगल्या देखील आहेत. असो…

तर आता ऐरणीवरचा मुद्दा हा आहे की या भूमिपुत्रांना आरक्षण देण्याचा! आणि गेल्या अनेक वर्षांपासून नेमका हाच मूलभूत हक्क राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, सत्तापिपासू वृत्ती यामुळे आरक्षणाची मर्यादा, न्यायालय आदी नानाविध कारणे दाखवून नाकारला जातोय अथवा लांबणीवर टाकला जातोय. आणि हे करण्यासाठी सत्ताकांक्षी-सत्ताधारी बटुच्या झारीत छगन , राणे, कदम तर कधी सदावर्ते सारखे (मॅनेज) शुक्राचार्य आडवे येताहेत. आता यांच्याविषयी काय लिहावं… भुजबळांच्या नावातच “छगन” आहे त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक न लिहिलेलंच बरं ! ☺️ ते दिडफुटी राणे व तोतले कदम… ते कोकणातले आणि कोकणाविषयी अधिक काय सांगावे? इंग्रज येण्यापूर्वी पंधराव्या शतकात वास्को-दि गामा हा पोर्तुगीज चाचा कोकण-गोवा या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचला आणि तेव्हापासून पिढ्यानपिढ्या तिथे वर्णसंकर सुरू आहे.

त्यामुळे या दिडफुटया आणि तोतल्याचा डीएनए जर तपासला तर नक्कीच ९६ वगैरे की संकरित वाण (हायब्रीड)आहे आदी तपशील बाहेर येतील. आणि तो बांगेलाल गुणरत्न… ग्रहणात देखील असली अवलाद जन्मत नसेल, असलं अवलक्षणी कार्ट जन्माला आल्यावर त्याचं नाव गुणरत्न ठेवणाऱ्या आई-बापाचं कौतुक करावं की त्यांना हे नाव सुचवणाऱ्याचं ? हा खरंच यक्षप्रश्न आहे. नथुरामला भारतरत्न म्हणणारी ही देशद्रोही, समाजद्रोही, दळभद्री औलाद कधीतरी त्याचा घडा हा भरणार आहेच. असो…

तर नाथाजीराव तुम्ही तरी पाक आहात असं अजून तरी आम्हा मराठयांना वाटतंय,आहात ना ?☺️ सध्याच्या सत्तेच्या खेळात कोण गद्धार, कोण महागद्धार वगैरे असल्या बाबींशी आम्हाला काहीही घेणं-देणं नाहीय आम्ही तुम्हाला पाक यासाठी म्हणतोय की तुम्ही मूळचे सातारा जिल्ह्यातले… ज्या भूमीत आजही छत्रपतींची गादी-वारसा आहे, ज्या भूमीला शूर-वीर आणि देशभक्तांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे निदान तुम्ही तरी आता ठाम भूमिका घेऊन ठोस निर्णय घ्याल अशी अजूनही आशा-अपेक्षा वाटतेय. पण हेही लक्षात ठेवा नाथाजीराव की आता वेळ खूप थोडा राहिलाय. आता जर उशीर झाला तर मराठा समाज हा समाजद्रोही अशा कुणालाच माफ करणार नाही मग त्याला अपवाद तुम्हीही नसणार आहात… आणि आठवलं म्हणून सांगतो शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता आहात तर मग शिवरायांसारखे रत्नपारखी व्हा, तुमच्याही आसपास, गोतावळ्यात जमा झालेले सदावर्तेसारखे काही “गुणरत्न “शोधून त्यांना खड्यासारखे बाजूला करा नाही तर मग पश्चात्तापाची वेळ येईल पण तोवर वेळ गेलेली असेल ..!
– विवेक शं. येवले,करमाळा.०१/११/२३
मो.९४२३५२८८३४

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE