भाजपात मोहिते व निंबाळकरांच्या वेगवेगळ्या गटावरुन संपर्क प्रमुख शिंदे थेटच बोलले
करमाळा समाचार
भाजपाच्या वतीने जनसंपर्क अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने समन्वयक जयकुमार शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत माहीती दिली यावेळी लोकसभेसाठी तयारी व केंद्राने राबवलेल्या योजना व झालेल्या कामे कशी झाले याबाबत माहीती घेणे यासाठी पुढील चौदा कार्यक्रम राबवले जाणार आहेत. आ. रणजीतसिंह मोहिते व खा. रणजीतसिंह नाईकनिंबाळकर तर दोन गट वैगेरे काही नसुन लोकांच्या कामासाठी सर्वच लक्ष देत आहेत त्यामुळे त्यात काय वावग नाही असेही शिंदे म्हणाले.

यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, अभियान रॅली, संपर्क से समर्थक विधानसभा क्षेत्रातील प्रभावशाली पन्नास घरांना भेट देऊन माहीती देणे, लोकसभा मतदार संघात जाहीर सभा, पत्रकार परिषद, बुद्धिजीवी लोकांचा मेळावा त्याअ राजकारण विरहित लोकांना योजना कळवणे, सोशल मेडीया प्रतिनिधी मेळावा, व्यापारी संमेल्लन, विकासतिर्थ मध्ये संबंधित विकास कामावर नेऊन पाहणी करणे,

जेष्ठ कार्यकर्त्यांसोबत बैठक यात माजी सैनिक व रिटायर लोकांचा समावेश, सयुक्त मोर्चा आणि संमेल्लन, योगा शिबीर २१ जुन, लाभार्थी संमेल्लन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विडिओ कॉन्फरन्सिंग त्यात आढावा, घरघर संपर्क अभियान या मध्ये ५०० घरापर्यत पोहचणार व केंद्र व राज्यांची कामे सांगणार आहेत असे उपक्रम राबवणार आहेत.
तर लवकरच खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर बैठका घेणार आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे हे उपस्थित होते.