करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

गांजा विक्री करताना एकास करमाळा पोलिसांकडुन अटक

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील मलवडी येथील अनिल वसुदेव लवळे वय 42 वर्षे हा गांजा विक्री करताना मिळुन आला आहे. यावेळी ताकडील गांजा जप्त करुन त्यास करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रवीण साने यांनी कारवाई केली आहे.

दि 16 रोजी पावणे बारा वाजता मलवडी गावात पोहचल्यानंतर मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अनिल लवळे याचे घराजवळ जावून पोलिसांनी खाजगी वाहन रस्त्याचे बाजूला लावून गाडीतून पोलीस स्टाफ व दोन पंच, वजनकाटा माहितगार इसम असे छाप्याच्या साहित्यासह खाली उतरले.

त्यावेळी त्यांना एक इसम त्याचे ताब्यात एक पांढरे रंगाची पिशवी घेवून बसलेला दिसला. त्याचा संशय आल्याने ते त्याचेजवळ गेले असता. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिल लवळे रा.मलवडी ता.करमाळा असे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या ताब्यातील पिशवी तपासून पाहता त्यामध्ये गांजा सदृश्य माल दिसल्याने त्याबाबत पोलिसांनी अनिल लवळे यास विचारणा केली असता अनिल लवळे हा तो गांजा असल्याचे मान्य केले. यावेळी त्याच्या कडुन १८५० ग्रम वजनाचा गांजा जप्त केला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE