करमाळासोलापूर जिल्हा

बागल संपर्क कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

करमाळा समाचार

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज बागल संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला प्रेरणादायी आहेत. लढायला आणि संघर्ष करण्याची प्रेरणा आम्हाला साहेबांनी दिली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्व. बाळासाहेब ठाकरेंचे नाव कायम अजरामर राहणार आहे. त्यांचे विचार, तत्व आम्ही समाजाच्या तळागत पोहोचवण्यासाठी कटिबध्द असू असे तालुक्याचे शिवसेना नेते दिग्विजय बागल यांनी सांगितले.

बागल संपर्क कार्यालयात ही जयंती साजरी करतेवेळी तालुका शिवसेना नेत्या रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, नगरसेवक सचिन घोलप, विजय लावंड, युवासेनेचे सचिन काळे, पोथरे गावचे माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, वरकटणे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण मस्कर, युवासेनेचे शंभूराजे फडतरे, सौंदे गावचे जोतीराम लावंड, नगरसेवक प्रतिनिधी कुमार माने, पोथरे गावचे नुतन ग्रामपंचायत सदस्य विशाल झिंजाडे, धनंजय झिंजाडे, अमर शिंगाडे, अमोल कांबळे उपस्थित होते.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE