करमाळासोलापूर जिल्हा

महात्मा गांधी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अभयारण्यास भेट

करमाळा समाचार 

वन्यजीव विभाग, करमाळा यांनी उजनी धरण, भिगवण आणि कुंभारगाव (ता. इंदापूर जि. पुणे) क्षेत्रामधील पक्षी निरीक्षण तसेच कडबनवाडी चिंकारा अभयारण्य (ता. इंदापूर जि. पुणे) अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये येथील महात्मा गांधी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
कडबनवाडी चिंकारा अभयारण्य येथे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतल नगराळे यांनी विद्यार्थ्याना चिंकारा अभयरण्यातील वन्यजीवांची संख्या त्यांच्यासाठी तयार केलेले ऑक्सिजन पार्क, पाणवठे, वन्यजीवांचे अधिवास, त्यांची अन्न साखळी, गवताळ प्रदेशातील परीसंस्था, आदि विषयाची सखोल अशी माहिती दिली.

कुंभारगाव (ता. इंदापूर जि. पुणे) येथे विद्यार्थ्यानी उजनी जलाशयामध्ये नौका विहार करत पक्षी निरीक्षण केले यावेळी प्राणीशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. दिग्विजय लावंड यांनी उजनी धरण परीसरात प्रामुख्याने आढळणारे जांभळी कोंबडी, शेकाट्या, थापट्या, पान कावळा, राखी बगळा, वारकरी, मग्धबलाक आदि पक्षांची सविस्तर माहिती दिली.
या अभ्यास सहलीचे आयोजन केल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतल नगराळे यांचे सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यानी आभार मानले.

यावेळी जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सी. के. हूनशीमरद, प्रा. सौ. एस्. ए. बुद्रुक, वनपाल श्रीमती दिपाली शिंदे, वन रक्षक श्री. गणेश झिरपे, वन मजूर हुसेन शेख उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE