हमाल पंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी
करमाळा समाचार सुनिल भोसले
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 387 व्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास ॲड. राहुल सावंत व संजय पप्पू सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तालुका हमाल पंचायत येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ‘ हमाल भवन ‘ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तदनंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे.यानिमित्ताने शिवरायांचा आदर्श विचार सर्वानी घेऊन त्याप्रमाणे लोकहितासाठी त्या विचारांचे आचरण करावे असे मनोगत यावेळी हमाल पंचायत अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य ॲड राहुल सावंत यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी नगरसेवक व मा सभापती बांधकाम विभाग संजय पप्पू सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वालचंद रोडगे, संचालक बाळासाहेब गोडसे , मा.संचालक विठ्ठलराव रासकर, उपाध्यक्ष गजानन गावडे, उपाध्यक्ष मोहनराव आवटे, खजिनदार सतीश केकाण, सरपंच भोजराज सुरवसे, भिमराव लोंढे, मोहम्मद अली पठाण , माजी नगरसेवक फारूक जमादार, खलील मुलाणी, संतोष कुकडे, संजय गायकवाड ,अंकुश ढवळे, लक्ष्मण शिरसागर, नानासाहेब मोरे ,दिनकर चव्हाण, प्रमोद गायकवाड, सोपान बारवकर,विकी कांबळे, राहुल कांबळे, महादेव कांबळे, राजू कांबळे, गणेश काकडे, आनंद रोडे ,वाजिद शेख,बबन डोंगरे, न ज्ञानेश्वर गोसावी, प्रकाश आगलावे, सुभाष विटकर ,रामा कारंडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी हमाल पंचायत व दिवाणजी संघटना यांच्यातर्फे कामगारांना हमाल भवन येथे अल्पोपहार देण्यात आला.