करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा युवा सेनेचा अनोखा उपक्रम

करमाळा प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस करमाळा युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले तसेच पांजरपोळ येथील गो शाळेस चारा वाटप करण्यात आला.

यावेळी बोलताना युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड म्हणाले की, शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आलेख चढता ठेवण्यासाठी आम्ही युवा सैनिक कार्य करणार आहोत. प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची पुनर्बांधणी करणार असून शिवसेनेची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार आहे. तसेच युवकच क्रांती घडवू शकतात. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा या निवडणुकात युवा सेनेची मजबूत फळी करमाळा तालुक्यात उभा करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी गायकवाड यांनी केले.


या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुका प्रमुख देवानंद बागल, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, रुपाली शिंदे, देवळालीचे युवा नेते अमोल शिंदे, वरकटणेचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे, अनिल फाटके, पप्पू चोरमले, आदेश नरुटे, आण्णा यादव, खंडू जगताप, हनुमंत रंदवे, विजय हजारे आदि युवा सैनिक उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE