भल्याभल्या संघांचा धुव्वा उडवत शिवक्रांती संघ ठरला नंबर वन; चुरशी सामन्यात विजय
करमाळा समाचार
गणेश चिवटे युवा मंच व शिवक्रांती स्पोर्ट क्लब आयोजित श्रीराम चषक स्पर्धेत शिवक्रांती स्पोर्ट्स क्लबने कडा आष्टी संघावर दमदार गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक शिवक्रांती स्पोर्ट ने तर द्वितीय कडा ता. आष्टी या संघाने पटकावले. तर तिसरा मानकरी जेऊर हा संघ ठरला आहे.

मागील सात दिवसांपासून करमाळा तालुक्यात युट्युब लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार रंगला होता. फुल पीच क्रिकेट सामन्यांमध्ये ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक शिवक्रांती संघाने पटकावले. तर द्वितीय ३१ हजारांचे कडा आष्टी, तृतीय २१ हजार जेऊर ने व चतुर्थ क्रमांकाचे अकरा हजार रुपयांचे पारितोषिक डिंगडॉंग टाकळी संघाने पटकावले. अखेरच्या दोन्ही सामन्यात फलंदाजी बरोबर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे शिवक्रांती विजय शक्य होऊ शकला. गोलंदाजीत अमोल कासार, सुरज गुप्ता, योगेश मुथा व भारत पाटील यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. तर फलंदाजीत आकाश कदम, अझर जमादार, रोहित परदेशी, उमेश फंड मुज्जु कुरेशी, अब्दुल शेख,सुमीत सरवदे, विलास धायतोंडे, रतन सिंग, सुशील पवार यांची खेळी शिवक्रांतीसाठी प्रभावशाली राहिली.

मालिकावीर म्हणून जेऊर संघाचे राहुल घोरपडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जेऊर संघाचे हनुमंत पांढरे व उत्कृष्ट फलंदाज म्हणून शिवक्रांती संघाचे अझहर जमादार यांना सन्मानित करण्यात आले. या सामन्यासाठी पंच म्हणून तुषार मेटे, लक्ष्मण खंडागळे, प्रकाश सुतार (डांसिंग पंच), स्वप्निल काकडे तर समालोचक इरशाद बागवान स्कोरर रितेश कांबळे यांनी काम पाहिले. स्टुडिओ स्पोर्ट, सोलापूर
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, रामा ढाणे, विनय ननवरे, सतिष फंड, डॉ. मुरुमकर, किरण बोकन, अफसर जाधव, बाळासाहेब कुंभार आदि उपस्थित होते तर आयोजन शिवक्रांती व गणेश चिवटे युवा मंच ने पार पाडले. सदरच्या स्पर्धेत विश्वजीत परदेशी, तौसीफ सय्यद यांनी आयोजन म्हणुन महत्वाची भुमीका पार पाडली.