बोरगावात शिवक्रांतीचा बोलबाला ; तीस संघातुन ठरला विजेता
करमाळा समाचार
बोरगाव येथे आयोजित शिवसाम्राज्य चषक बोरगाव येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये शिवक्रांती स्पोर्ट क्लब व शिवसाम्राज्य क्रिकेट क्लब यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात शिवक्रांती संघाने बाजी मारत अंतिम सामना आपल्या खिशात घातला आहे. या मालिकेमध्ये जवळपास तालुक्यासह शेजारील तालुक्यातील ३० संघ सहभागी झाले होते. यावेळी प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये हे शिवक्रांती संघाने पटकावले आहे.

दिवाळी निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धांमध्ये शिवक्रांती संघाचा पहिल्या सामन्यापासून बोलबाला राहिला होता. या सामन्यांचे आयोजन बोरगाव येथील शिवसाम्राज्य क्रिकेट संघाच्या वतीने करण्यात आले होते. प्रथम बक्षीस २१ हजार रुपये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, द्वितीय बक्षीस पंधरा हजार रुपये भुई समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नंदकुमार नगरे व तृतीय बक्षीस ११ हजार रुपये रणजीत नलवडे यांच्या वतीने देण्यात आली होते. दि ४ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या या सामन्यांमध्ये शिवक्रांती संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय क्रमांक शिवसाम्राज्य स्पोर्ट क्लब व तृतीय क्रमांक दहिगाव क्रिकेट क्लब यांनी पटकावला आहे.

आठ षटकांच्या सामन्यात मध्ये अखेरच्या सामन्यात शिवसाम्राज्य संघाने ५९ धावांपर्यंत मजल मारली होती. शिवक्रांती संघाने उत्कृष्ट फलंदाजी करीत ६० धावांचे आव्हान सहा शतकात पूर्ण करून शिवसाम्राज्य संघाचे आव्हान संपुष्टात आणले होते. शिवक्रांती संघ तालुक्यात विविध ठिकाणी जाऊन विजयी कामगार करत आजही तालुक्यात प्रथम क्रमांकाचा संघ म्हणून ओळखला जात आहे. सदरचे पारितोषिक गृपचे संस्था विनय ननवरे व कर्णधार अभिषेक शेलार यांनी स्विकारले. यासामन्यांसाठी बक्षीसासह पहिल्या क्रमांकास यशकल्याणीच्या गणेश करे पाटील यांच्या वतीने चषक ठेवण्यात आला होता.