सर्व्हर च्या अडचणीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत महत्वाचा बदल ; आज अंतीम दिवशी वेळही वाढवली
करमाळा समाचार
आयोगाच्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे 14,234 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तरी त्याचे काम सुरू असताना संगणक प्रणाली मध्ये त्रुटी आढळल्याने ऑनलाइन ऐवजी आता ऑफलाइन ही अर्ज स्वीकारले जाणार आहे. तर त्याची वेळ वाढवून साडे पाच पर्यंत करण्यात आले आहे. आजचा अंतीम दिवस असल्याने मोठ्याप्रमाणावर संबंधित विभागावर येऊ शकतो व प्रत्येकाला नामनिर्देशन पत्र भरण्याची संधी मिळावी या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.

आतापर्यंत राज्यभरात संगणक प्रणालीद्वारे एकूण 3 लाख 32 हजार 844 इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना दिनांक 28 रोजी सायंकाळी पासून काही तांत्रिक अडचणी म्हणजेच इंटरनेट गती कमी होणे, सर्व्हर डाऊन होणे सर्व अडचणी इत्यादी आयोगाकडे प्राप्त झाल्यानंतर आयोगाच्या वतीने निर्णय घेण्यात आला की, नामनिर्देशनपत्र भरण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून पारंपारिक पद्धतीने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात यावेत. तरी आज अखेरचा दिवस असल्याने तीन वाजेपर्यंत मुदत होती. पण आता ती मुदतही साडेपाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

करमाळा 51, माढा 52, बार्शी 96, उत्तर सोलापूर 24, मोहोळ 76, पंढरपूर 72, माळशिरस 49, सांगोला 61, मंगळवेढा 23, दक्षीण सोलापूर 52, अक्कलकोट 72 जिल्ह्यात अशा एकूण 658 जागांवर ती निवडणुका होणार आहेत.