करमाळासोलापूर जिल्हा

राजेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

करमाळा समाचार -संजय साखरे

राजुरी ता करमाळा येथील श्री. राजेश्वर विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व एसएससी परीक्षा २०२२ साठी सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा कार्यक्रम श्री. राजेश्वर विद्यालयाच्या मैदानावर आज आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव श्री. लालासाहेब गोविंदराव जगताप हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विध्यार्थी प्रा. संजय पांडूरंग चौधरी सर हे उपस्थित होते . व्यासपीठावर बोलत असताना श्री. चौधरी सरांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शाळेच्या भौगोलिक व शैक्षणिक प्रगती साठी आम्ही नेहमी कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले.

अध्यक्षीय भाषणात जगताप सरांनी शाळेचा इतिहास सांगितला .तसेच शाळेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. सारंगकर साहेबांनी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या शैक्षणिक अडचणीसाठी केव्हाही आर्थिक तसेच इतर मदत करू व विद्यार्थ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

चौधरीसरांबरोबरच त्यांच्या वर्गातील त्यांचे सहकारी मित्र १९८७ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीला असणारे प्रशालेच्या प्रथम बॅचचे विद्यार्थी रावसाहेब अजिनाथ जाधव, सुनील कल्याण पाटील, विठ्ठल निवृत्ती देशमुख, कुंडलीक विठ्ठल साखरे, विकास विठ्ठल सारंगकर, रसूल लाला सय्यद हे उपस्थित होते. त्या बरोबरच व्यासपीठावर देवा रावसाहेब सारंगकर (कृषी अधिकारी करमाळा), माजी मुख्याध्यपक सुखदेव तात्या साखरे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल सोपान झोळ, डॉ.अमोल दादासाहेब दुरंदे( सरपंच – राजुरी), डॉ. पापा बिज्जू मनेरी, श्री. संतोष साहेबराव पाटील (मकाई संचालक), निवृत्त क्रीडा शिक्षक रणशिंग सर, रावसाहेब जागताप, महानंदा अर्जुन कांबळे आदि मान्यवरांसह प्रशालेचे शिक्षक- शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.धनंजय सुखदेव साखरे यांनी केले तर उपस्थीत मान्यवरांचे आभार प्रदर्शन श्री. मारूती संदिपान साखरे यांनी केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE