Uncategorized

उजनीच्या पाण्यात संथ गतीने वाढ ; मोठ्या पावसाची गरज

करमाळा समाचार -संजय साखरे

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसापासून पाऊस चालू असून यामुळे मागील 24 तासात धरणात एक टीएमसी इतकी पाण्याची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 12 जुलै रोजी प्लस मध्ये आलेले उजनी धरण यावर्षी जुलै संपत आला तरी अजून प्लस मध्ये आले नाही. ही वाढ म्हणावी तितकी समाधानकारक नसली तरी यामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात दौंड येथून २३८७०क्यूसेक या वेगाने पाणी येत असून धरण मायनस २४.५८ इतके झाले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार-पाच दिवसापासून चांगला पाऊस चालू असून ही परिस्थिती आणखी चार-पाच दिवस राहिल्यास उजनी धरणात बऱ्यापैकी पाण्याचा विसर्ग येऊ शकतो.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास सर्वच धरणांचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आसपास झाला आहे. त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग लवकरच वाढण्याची शक्यता आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या या पावसामुळे उजनी बॅक वॉटर परिसरातील शेतकरी सुखावला असून आडसाली उसाच्या थांबलेल्या लागणीआता चालू होणार आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE