E-PaperUncategorizedसाहित्य

संत बाळुमामा नेमके कोण होते ? संत बाळुमामांचा इतिहास …

करमाळा समाचार – karmala samachar

उंदरगाव च्या मनोहर मामा (manohar mama) यांच्या कथित वंशजाच्या वादावरून करमाळा (karmala) तालुक्यात संत बाळूमामा (balumama) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी ते सर्वत्र परिचित होतेच. पण आता सुरू असलेल्या वादामुळे संत बाळूमामा यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी व सुरू असलेल्या वादात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण अशीच काहीशी माहिती संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या इतर अभ्यासकांच्या लेखणीतून आपल्यासाठी संग्रहित केली आहे. त्या माहितीच्या आधारे बाळूमामा चा इतिहास (history) आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. (माहितीस्तव)

Adamapur

संत बाळूमामा यांचे मुळ नाव बालप्पा असुन त्यावेळची मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गांव आहे. या गावातील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या धनगर जोडप्याच्या पोटी ३ ऑक्टोबर १८९२ बाळूमामांचा जन्म झाला.

लहानपणीच ते सर्वात वेगळे वागत असत. त्यामुळे त्यांना जैन समाजातील व्यापारी चंदुलाल यांच्याकडे कामाला ठेवले होते. ते त्यांच्या बहिण गंगुबाई खिलारे यांच्याकडे राहत असल्याने त्यांचे भाचे मामा म्हणत असत म्हणून ओघाओघाने ते पुन्हा सर्वत्र मामा याच नावाने परिचित झाले.

Balumama

त्यांच्या बाबत अशी आख्यायिका संगितली गेली आहे की, उन्हाळ्याच्या दिवसात दोन साधू बाळू मामा यांना मिळाले त्यांना एका अवघड ठिकाणच्या खोल विहिरीतून पाणी पाजुन बाळू मामांनी त्यांना तृप्त केले. त्याचाच मोबदला म्हणून त्या साधुनी बाळूमामा वाचासिद्धी व कार्यसिद्धी चा आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांना एक आकाशवाणी झाली “तू गुरु करून घे” अशी सूचना आणि त्यावेळी बाळुमामानी ठरवले भुत काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईल असे बाळूमामा ठरवले होते. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व बाळू मामांना म्हणाले “बाळू तू भुते काढलेले 120 रुपये मला दे” हे ऐकताच बाळूमामानी मुळे यांना गुरु म्हणून महाराजांचे पाय धरले.

Balumama_paduka

मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी फिरत असत. प्रसिद्धीची त्यांना कधीच हाव नव्हती ज्या त्या वेळी गरजेनुसार त्यांनी चमत्कारही घडवले. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी भाषेत ते सर्वांना न्याय देत धर्म चरणाचा उपदेश करत. शिव्याही देत, त्यांच्या शिव्या म्हणजे लोक आशीर्वाद म्हणून घेत असत.

शर्ट, धोतर, फेटा, कोल्हापुरी चप्पल, कांबळा असा मामांचा पेहराव होता. ते कायम बकऱ्या सोबत शिवारातच मुक्काम करत असत. गोरगरिबांना अन्नदान व्हावे म्हणून 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला.

आदमापुर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून अनेक प्रवासी त्या ठिकाणी थांबतात. बाळूमामाच्या मूर्ती शेजारी उजव्या हाताला सद्गुरू परमहंस मुळे महाराज, गारगोटी यांची मूर्ती आहे. तर डाव्या बाजूला विठ्ठल-रखुमाईची सुंदर मूर्ती आहे. शेजारी श्री हालसिद्धनाथ यांची प्रतिमा आहे. सदर ठिकाणी भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो. दक्षिणा वगैरे काही मागितली जात नाही.

बाळुमामाच्या सानिध्यात माणसं सुधारतात त्याशिवाय त्यांच्या सहवासात आलेले प्राणी जनावरे ही सद्गुणी होतात हे विशेष आहे. त्यांच्याकडेही भीमा नावाचा पांढराशुभ्र केसाळ कुत्रा होता. एकादशी दिवशी फक्त दुध पीत असे दुसरे काही घातले तर खात नसे. इतर वेळी सुद्धा त्याचे शुद्ध शाकाहारी खाणे होते.

बाळुमामाची माहीती –
वयाच्या ७४ व्या वर्षी मामा सगुणरूप अदृश्य झाल

मंदिरात किंवा बघ बकऱ्याच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्या ला पदोपदी प्रचिती येते

देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होती. त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो.

स्वतः मामा आपल्यासाठी कोणतीच सिद्धी वापरत नसत. याबाबतीत ते माणिकप्रभू महाराज ( हुमनाबाद- गुलबर्गा ) यांच्या सारखेच होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE