करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महिलांसाठी भरीव योगदान देण्यासाठी आता सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा – जोतीताई पाटील

करमाळा

ग्रामीण भागातील महिलांसाठी भरीव योगदान देण्यासाठी आता सामाजिक संघटनानी पुढाकार घ्यावा असे आवाहन महिला नेत्या जोतीताई पाटील यांनी केले. जेऊर ता.करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर ग्रामपंचायत आणि आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने एका भव्य महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात गेले आठवडाभर महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच आरोग्य तपासणी व‌ मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात आली होती. विविध स्पर्धामधील विजेत्यांना आज मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.

यावेळी रांगोळी, वक्तृत्व, पाककला, अभिनय, वेशभुषा, डान्स, उखाणे, अंताक्षरी गीत गायन व‌ फनी गेम्स आदिंचा समावेश होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ ज्योती ताई पाटील होत्या तर यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्या सौ समीरा दोशी, प्रियांका निर्मळ, सुलभा घाडगे, रोहिणी सुतार, परवीन नदाफ, अनिता जगताप, भोसले ताई, ताहिरा शेख, जनाबाई कांबळे, येवले वहिनी, रत्नमाला बादल, उषाताई सरक, वैशाली शिंगाडे आदिसह इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या.

politics

कार्यक्रमाचे सुरुवातीस राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रियांका पाटील यांनी सुरेल गायन केले तर कृष्णाई मोटे हिने कविता सादर केली. यावेळी बोलताना ज्योती ताई पाटील म्हणाल्या की जेऊर येथे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेताना राहण्याची सोय म्हणुन एक होस्टेल उभारले जावे.

तसेच होतकरु व हुशार मुलींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अद्यावत अभ्यासिका उभारली जावी हेच २२ वर्षे अखंडीत पणे महिला दिन साजरे करण्याचे फलीत असेल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्या रोहिणी सुतार यांनी केले तर आभार संयोजिका समृध्दी कुलकर्णी हिने मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE