पडवळे सारख्या युवा नेत्याची समाजाला गरज – माहुले
करमाळा समाचार
सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी विनोद पडवळे यांच्यासारख्या युवकांची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज असून पडवळे यांनी सामाजिक कार्य करत असताना समाजाचे हीत डोळ्यासमोर ठेवून राजकारणात प्रवेश करायला हरकत नसल्याचे मत धर्मवीर फायनान्स चेअरमन सचिन माहुले यांनी व्यक्त केले.

सामाजिक कार्यकर्ते विनोद पडवळे यांच्या वाढदिवसानिमित्त पोथरे नाका या ठिकाणी मोठ्या जल्लोषात कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी करमाळ्यातील प्रसिद्ध बँड पथकाचे सर्वेसर्वा मुख्तार पठाण हे उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन माहुले यांनी पडवळे यांचा कार्याचा लेखाजोखा ऐकवला. तर युवा पिढीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे अशा सूचनाही दिल्या.

पुढे बोलताना माहुले म्हणाले की आज समाजाला नेतृत्वाची गरज असून समाजातील युवक सध्या भरकटलेले दिसून येतात. याच भरकटलेल्या मुला मुलींना चांगली योग्य दिशा दाखवण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन तसेच एका पाठबळाची गरज असते ते पाठबळ पडवळे यांच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकेल. पडवळे यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.