सोलापूर पोलिसांची करमाळा तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा ; दहा जणांसह ७ लाखाचा मुद्देमाल ताब्यात
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील पांगरे हद्दीत एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नऊ हजाराची रोख रक्कम तर गाडी व इतर साहित्य असे मिळून सात लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई दि ३ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास सोलापूर तसेच करमाळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली आहे. याप्रकरणी फिर्याद समाधान केरू माने यांनी दिली आहे.

दि 03 जुन रोजी दुपारी ४ वा.चे सुमारास मौजे पांगरे हद्दीत ज्ञानदेव कोपनार यांचे घराचे शेजारी असणा-या चिकूच्या झाडाच्या खाली दहा लोक जुगार खेळत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारावर संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला यात सर्व मुद्देमाला सह दहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी 1) सोमनाथ बिभषण माने, वय 35 वषे, रा. कुराड गल्ली, परांडा, 2) भागवत अनंत दुबल , वय 46, रा. बिटरगाव, 3) समाधान रामहरी पिंगळे, वय 38 वषे, रा. अरणगाव, ता. परांडा, 4) आनंद विलास भोसले, वय 24 वषे, रा. वांगी नं1, ता. करमाळा, 5) बाबासाहेब अंकुश उगडे, वय 41 वषे, रा. वांगी, 6) रमजा जहुन शेख, वय 37 वषे, रा. परांडा, ता. परांदडा, 7) केदार आप्पा जाधव, वय 25 वषे, रा. कोळेगाव, ता. करमाळा, 8) सागर जनार्धन कारंडे, वय 36 वषे, रा. केम, 9) तानाजी गोरख आरिकले, रा. भिवरवाडी, ता. करमाळा, 10) नितीन गोरख
तळेकर, रा. केम, ता. करमाळा हे सर्व तिराट नावाचा जुगार खेळताना आढळले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
सोलापूर पथकासह करमाळ्यातील पोलिस उपनिरिक्षक विनायक माहुरकर, प्रमोद गवळी, मनोज खंडागळे व पवार यांनी ही कारवाई केली आहे.