सात मिनिटाऐवजी सहा मिनिट २१ सेकंदात सोडवले शंभर गणीते ; समिक्षाने पटकवला प्रथम क्रमांक
समाचार टीम
अबॅकस स्पर्धेत करमाळा येथील कै. साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींची शाळा क्रमांक एक ची इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनीं समीक्षा महेश थोरे हिने सहा मिनिट 21 सेकंदामध्ये शंभर गणिते अचूक सोडवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धा नुकत्याच ऑनलाइन पद्धतीने झाल्या. यामध्ये 23 देशांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

समिक्षा थोरे ही एक अत्यंत गुणवान विद्यार्थीनी असुन तीने यापुर्वी इतर स्पर्धा नावीन्यपूर्ण कामगिरी केली आहे. 30 व 31 जुलै 2022 रोजी झालेल्या अरिस्टो किड्स अंतर्गत ऑनलाईन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण 23 देशासह 1950 विद्यार्थ्यांचा विविध लेव्हल्स मधून या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सात मिनिटात 100 गणिते अचूक सोडवणे अनिवार्य होते. या स्पर्धेत कै. साधनाबाई नामदेवराव जगताप मुलींची शाळा क्रमांक एक ची इयत्ता तिसरी व सौ ज्योती मुथा यांच्या अभ्यास अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा महेश थोरे हिने सहा मिनिट 21 सेकंदामध्ये 100 गणिते अचूक सोडून सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे व तिला अरिष्टो किड्स कडून ट्रॉफी व स्मार्ट वॉच देण्यात येणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी व सर्व शिक्षक यांनीही तिचे कौतुक केले आहे व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.