करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भुकंप ; अजित पवारांच्या सोबत आमदार राजभवनात

करमाळा समाचार

महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप शिवसेनेच्या आमदारानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार ही सत्ताधारी गटासोबत. विरोधी पक्षनेते  अजित पवार आमदार घेऊन सत्ताधाऱ्यांबरोबर जाणार आहेत. प्रफुल पटेल यांचा अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. राजभवनावर शपथविधीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार, छगन भुजबळ हे शपथ घेताना दिसतील.

अजित दादा यांच्या नाराजी बद्दल आतापर्यंत सूत्रांच्या माध्यमातून मिळालेले माहिती अखेर आज खरी ठरली आहे. शिवसेनेसारखी आता राष्ट्रवादी ही फुटल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात आता विरोधी पक्ष नेता सत्ताधारी गटात गेल्याने मोठी खळबळ माजली आहे.

यामुळे आता प्रत्येक तालुक्याचे राजकारण बदलताना दिसणार आहे. त्यामध्ये करमाळा तालुक्याचा ही समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व फडवणीस यांच्या जवळचे मानले जाणारे माजी आमदार नारायण पाटील हे तालुक्यात काम करत असताना आता अजित पवार यांच्या निकटवर्ती असलेले आमदार संजय मामा शिंदे हे अजित दादा सोबत असल्यामुळे तालुक्याचे ही चित्र भावी काळात बदलताना दिसेल.

तर अजित पवार यांच्या नावामुळे बऱ्याच जणांनी राष्ट्रवादी सोडून दुसरीकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच कशाला शिंदे सरकारने ही अजित पवार यांच्या कारभारावर नाराज होत भाजपसोबत जाणे निर्णय घेतला होता. आता अजित पवार कसे चालतात हा प्रश्न उपस्थित होत असला तरी राजकारणात सध्या कधी काय घडेल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE