व्यसनी मुलाच्या त्रासाला कंटाळुन बापाने केली मारहाण ; मुलाचा मृत्यु बापावर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
दारु पिऊन मुलगा त्रास देत असल्याच्या कारणातुन बापानेच लोखंडी पट्टीच्या सह्हाय्याने मारहाण केली त्यात जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना दि ३० रोजी रात्री ९:३० च्या सुमारास केडगाव ता. करमाळा येथे घडली आहे. अर्जुन दगडु बोराडे (वय ८०) , व्यवसाय शेती, रा. केडगाव, ता. करमाळा असे संशयीत आरोपी बापाचे नाव आहे. याप्रकरणात बाळासाहेब अर्जुन बोराडे (वय ३४) हा मुलगा ठार झाला आहे.
बाळासाहेब यास दारुचे व्यसन होते. तो दारु पिऊन सतत घरात त्रास देत होता. शनिवारी रात्री बाळासाहेब घरात दारु पिऊन आला व नेहमी प्रमाणे त्रास देत असताना ९: ३० ते ९:४५ वा. चे सुमारास यातील आरोपीत अर्जुन दगडु बोराडे वय ८० वर्षे यांनी मयत बाळासाहेब अर्जुन बोराडे दारू पिऊन देत असलेल्या त्रासाला कंटाळुन लोखंडी पट्टी या हत्याराने डोक्यास मारून, त्याला छातीवरती लाथा बुक्याने मारहाण केली. यावेळी जखमी बाळासाहेब यास दवाखान्यात नेले पण उपचारापुर्वी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले.
तर याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली याबाबत अधिक माहीती घेतल्यानंतर वडीलांनीच आपल्या एकुलत्या एक मुलाचा खुन केल्याचे निष्पन्न झाले यावरुन सहाय्यक पोलिस निरिक्षक पोपट टिळेकर यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बाळासाहेब याच्या पश्च्यात पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.