करमाळासोलापूर जिल्हा

पार्श्वगायक प्रवीण अवचर यांचा करमाळा नगर परिषद तर्फे विशेष सन्मान

करमाळा समाचार सुनिल भोसले

हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निम्मित करमाळा नगर परिषद तर्फे विविध पुरस्कार देण्यात आले. यामध्ये करमाळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांनी लिहिलेल्या कोरोना गीत व स्वच्छ वसुंधरा अभियान पोवाडा यासाठी मांगी गावाचे सुपुत्र व महाराष्ट्राचे लाडके पार्श्वगायक प्रवीण अवचर यांना मुख्याधिकारी सौ वीणा पवार , अधिकारी शेख तसेच नगरसेविका स्वाती फंड यांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

आज 19 फेब्रु सकाळी 11 वाजता करमाळा नगर परीषद मध्ये विविध मान्यवर तसेच स्वछता अभियाना वरती विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात कोरोना चे काटेखोर नियम पाळून करण्यात आला. स्थानिक कलाकाराचा गावातच सन्मान होणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे असे मत पुरस्कार घेताना प्रवीण अवचर यांनि व्यक्त केले. अनेक पुरस्कार मिळाले परंतु आजचा पुरस्कार हा माझेसाठी खूप विशेष आहे असे अवचर म्हणाले.

या प्रसंगी शिव सेना नेते संजय शिंदे, पत्रकार बांधव करमाळा नगर परिषद कर्मचारी कामगार, शहरातील मान्यवर, मंडळी नगर पालिका शिक्षक ,स्पर्धक तसेच पालक हे हि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वातीताई माने मॅडम यांनी केले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE