करमाळासोलापूर जिल्हा

यशकल्याणीचे गणेशभाऊ करे-पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सामाजिक पुरस्कार २०२० प्रदान ; गुणवंत विद्यार्थी पुरस्काराचेही आयोजन

करमाळा समाचार

सालसे,ता.करमाळा येथील अभिनव भारत समाज सेवा मंडळाच्या वतीने पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यामधे शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा,सातारा सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळेस विविध क्षेत्रातील आदर्श काम करणा-या व्यक्तिंना गौरविण्यात आले.

यामधे आदर्श शिक्षक म्हणून शिवाजी येडे सर , आदर्श मुख्याध्यापक, दत्तात्रय खोबरे सर,आदर्श गोपालक श्रीमंत झाकणे, शेळीपालनातील यशस्वी उद्योजिका सौ.संगीता वसंत मोहोळकर, आदर्श ग्रामसेवक महेश काळे, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गणेशभाऊ करे-पाटील, कृषीतज्ज्ञ म्हणून नामदेव साबळे यांना शाल,स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन गौरविण्यात आला.

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोथरे येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद (बाबा) झिंजाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत होते.यावेळी प्रास्ताविक करताना संतोष राऊत यांनी संस्थेची वाटचाल, ध्येय उद्दिष्टे यांची माहिती दिली.

जगताप सरांनी विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षेचे संस्कार व्हावेत व विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा यासाठीच शिक्षण व्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद झिंजाडे यांनी अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे कौतुक केले,सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले व समाजसेवेचा वसा अविरत सुरू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळेस विशेष सत्कार म्हणून प्रदीप ननावरे यांची सशस्त्र सेना दलात निवड झाल्याबद्दल व प्रेमराज शेळके यांची औद्योगिक सुरक्षा दलात निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेंडगे मॅडम यांनी केले तर आभार सामाजिक कार्यकर्ते हरीश कडू सर यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE