ग्रामसुरक्षा दलाचे बळकटीकरण करा -पो .नि .ज्योतिराम गुंजवटे
करमाळा समाचार -संजय साखरे
राजुरी आणि परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गावातील युवकांची मदत घेऊन ग्राम सुरक्षा दलाचे बळकटीकरण करा असे आवाहन करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी केले.

गेल्या महिन्या पासून राजुरीत अनेक ठिकाणी चोरीचा घटना घडल्या आहेत .यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाड्या वस्तीवरील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी आज राजुरी येथील ग्रामस्थांची बैठक घेतली. यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील युवकांचे गट तयार करून ग्राम सुरक्षा यंत्रणेची मदत घ्या, वाड्या वस्तीवर फिरून लोकांना सावध करा ,मौल्यवान वस्तू व पैसे घरात ठेवू नका, दिवसा सुद्धा घरांना कुलपे लावून शेतातील कामे करा असे आव्हानही त्यांनी केले. ग्राम सुरक्षा दलातील युवकांना ओळखपत्रा बरोबरच बॅटरी आणि काट्या देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर , पोलीस नाईक खैरे, बीट हवालदार देवकर यांच्यासह राजुरी चे माजी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, आबासाहेब टापरे, आप्पा निरगुडे, राजेंद्र भोसले, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे, मनोज शिंदे,हनुमंत मेजर,भानुदास साखरे,दीपक साखरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.