करमाळासोलापूर जिल्हा

मकाई कारखाना निवडणुकीत विरोधक आक्रमक ; निवडणुक अधिकाऱ्यांची घेतली भेट

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधक आता आक्रमक झाले आहेत. त्यांना कारखाना प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यात लक्ष घालून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते हे तहसील परिसरात आले होते.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 2017 ते 2023 पर्यंत साखर कारखाना मध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांची संपूर्ण यादी त्वरित उपलब्ध करावी, शेअर्स रक्कम पूर्तता करण्यासाठी भरावयास लागणाऱ्या रकमेची व्यवस्था आपल्या कार्यालयात करण्यात यावी, कारखान्याची थकबाकी दाखला मिळण्यासाठी व्यवस्था आपल्याच कार्यालयात करण्यात यावी अशा मागण्यांसाठी आज विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.

http://*मकाई निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात तिसऱ्या दिवशी पहिला अर्ज दाखल* https://karmalasamachar.com/the-first-application-was-filed-on-the-third-day-of-the-makai-election-battle/

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली व यासाठी कारखान्यांकडे मागणी करा असा सल्ला दिला. यावेळी आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हीच आम्हाला सदरची माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. यावेळी प्रा. रामदास झोळ, रवींद्र गोडगे, सुभाष शिंदे, संतोष वाळुंजकर, बापू वाडेकर, बापू फडतडे, मारुती नीळ, दीपक शिंदे, अमोल घुमरे, सुदर्शन शेळके, अशोक लवंगारे आणि कांतीलाल शिंदे आदि उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE