आमदार रोहित पवारांचे मतदार संघासह जिल्ह्यासाठी दमदार काम ; इतर आमदारांनी आदर्श घेण्याची गरज
करमाळा समाचार
पुणे, अहमदनगर भागात रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप आ. रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने हे वाटप करण्यात आले आहे. आज रोहित पवार यांच्या हस्ते सोलापूरसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप पदाधिकाऱ्यांमार्फत सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द केले आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी ट्वीट करून दिली आहे.

याशिवाय नगर जिल्ह्यात दवाखान्यांसाठी 10 हजार मास्क व 650 बेडची व्यवस्थाकरुन कामाचा माणुस असल्याचे दाखऊन दिले आहे. इतर आमदारांनी त्यांच्याकडुन आदर्श घेतला पाहिजे.

अमहदनगर येथील कोरोनाचा वाढता आकडा पाहता रोहित पवार यांनी तेथील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाला सुरक्षिततेसाठी 5000 एन-95 मास्कचा पुरवठा केलाय. याशिवाय कर्जत-जामखेडसाठीही त्यांनी 5000 एन-95 मास्क पाठवले आहेत. त्यांनी कोरोना रुग्णांसाठी आवश्यक 25 ऑक्सिजन सिलेंडर कर्जतसाठी आणि 25 सिलेंडर जामखेडसाठी उपलब्ध करुन दिले आहे.