करमाळासोलापूर जिल्हा

उसाचा टॅक्टर आणी ट्रकची समोरासमोर धडक ; चालक जागीच ठार

करमाळा समाचार

उसाची वाहतुक करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ने टॅक्टरला समोरासमोर धडक दिल्याने टॅक्टर चालक गंभीर जखमी झाला व उपचारापुर्वीच ठार झाल्याची दुर्घटना (दि.३०) रात्री ८ सुमारास जिंती जाणाऱ्या रस्त्यावर कुंभारगाव शिवारात घडला आहे. यावेळी ट्रक चालक पळुन गेल्याने अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात विष्णु लक्ष्मण मांढरे (वय ५५) रा. पुर्व सोगाव ता. करमाळा हे मयत झाले आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी की, करमाळा जिंती रस्त्यावरुन सकाळी साडे आठच्या सुमारास उसाने भरलेला टॅक्टर (क्रमांक एम एच ४५ एफ ०१९२) हा घेऊन जात असताना समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक (एम एच १२ एफ झेड ४४९६) ने समोरासमोर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ट्रॅक्टर आणि ट्रक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

politics

दरम्यान परिसरातील ग्रामस्थांनी तिथे पोहचल्यानंतर जखमीला उपचारासाठी नेण्यापुर्वीच विष्णु मांढरे हे ठार झाले होते. यावेळी सावडी गावचे भाऊसाहेब शेळके, महेंद्र एकाड,शुभम अनारसे, सुनील शेळके तात्या शेळके तसेच कुंभारगावचे जालिंदरबापू पानसरे, दशरथ पानसरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर चालकास बाहेर काढले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group