पाटील यांना आमदार करण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्याना सुचना
करमाळा
244 करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महा- विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. नारायण (आबा) पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अधिक सक्रिय होणार असल्याचे मत करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांनी व्यक्त केले.
वाढती महागाई.. वाढती बेरोजगारी या गोष्टीला सर्वसामान्य जनता कंटाळलेली असून राज्यात परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीचा धर्म पाळत उर्वरित सात दिवसात करमाळा तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना व शाखेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आणखी गतीने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री नारायण (आबा )पाटील यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस (आय ) चे जिल्हाध्यक्ष मा. धवलसिहं मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढे आपण कार्यरत राहणार असल्याचे श्री. जगताप यांनी सांगितले.
यावेळी अधिक बोलताना श्री प्रतापराव जगताप म्हणाले की, संपूर्ण तालुक्यात बदलाचे वारे वाहत असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री नारायण आबा पाटील यांचा विजय तर निश्चित आहेच परंतु जास्तीत जास्त मतांनी नारायण आबा पाटील यांना विजयी करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आप- आपल्या गावांमध्ये जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढवणेही गरजेचे असल्याचे शेवटी श्री. जगताप यांनी सांगितले.