मराठा आरक्षणासाठी माजी नगरसेवक तथा समाजाचे अध्यक्षांची आत्महत्या
करमाळा समाचार
मराठा आरक्षण मिळावे मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा असल्याचे पत्र लिहित करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राखुंडे हे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून हताश झाले व त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मागील बऱ्याच काळापासून ते मराठा चळवळीत सक्रिय सहभागी होते. तर सध्या राज्यात असलेल्या आरक्षणाच्या वातावरणामुळे बऱ्याच ठिकाणी तरुणांनी आत्महत्या केल्याचे पाहिलं आहे. त्याच पद्धतीने राखुंडे यांनीही आत्महत्या केल्याने समाजामध्ये शोक व्यक्त होत आहे.

यावेळी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये मराठा आरक्षण मिळत नाही म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. तर याबाबत कोणीही तक्रार करू नये. मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा असल्याचेही चिठ्ठी मध्ये लिहिले आहे.