करमाळा

चेक बाऊन्सप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; प्रलंबीत केसेस बद्दलही केले विधान

करमाळा समाचार टीम 

देशभरात चेक बाउन्स प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आता याची गंभीर दखल घेत चेक बाउन्स झाल्यास संबंधित चेक देणाऱ्यावर सक्त कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गेल्या आठवडाभरात देशभरात चेक बाउन्स जवळपास 35 लाख प्रलंबित असल्याने विचित्र घटना असेही वर्णन सर्वोच्च न्यायालयाने केले आहे.

याप्रकरणी हायकोर्टाच्या माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली जाणार आहे. हीच समिती देशभरात होणारे चेक बाऊन्स प्रकरणी तीन महिन्याच्या आत निकाली काढणार आहे. केंद्र सरकार ही स्वतंत्र न्यायालय करण्यास तयार असून सरकारी वकील तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश एस ए बोबडे यांना सांगितले की, केंद्र सरकार चेक बाउन्स प्रकरणासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्यास तयार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात देशभरात चेक बाउन्स प्रलंबित 35लाख प्रकरणाला विचित्र असा उल्लेख केला. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अशी प्रकरणे निकाली काढण्यास स्वतंत्र न्यायालय आणि कायदा आणण्यास सांगितले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE