करमाळासोलापूर जिल्हा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचा अनुसूचित जाती व नवबौद्वानी लाभ घ्यावा

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुरूवात करण्यात आली असल्याची माहिती माजी सभापती शेखर गाडे यांनी दिली.

पुढे बोलताना गाडे म्हणाले, दिनांक 5 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार आपल्या विशेष घटक योजना सुधारित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात राबविण्यात येत आहे, या योजनेअंतर्गत रुपये 1.50 लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिर जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोअरिंग वीज जोडणी आकार पंप संच शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण सूक्ष्म सिंचन संच या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येणार आहे.

सन 2020-21या वर्षात राबविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने रू 27606.19 लक्ष अर्थ संकल्प केलेला होता तथापि कोविड 19 पॅन्डॅमिकच्या पाश्र्वभूमीवर विविध विभागाच्या दिनांक 4/5/2020 च्या शासन निर्णयास अनुसरून सामाजिक न्याय विभागाने अर्थसंकल्प निधीच्या 30 टक्के म्हणजेच रुपये 91.1 जिल्हास्तरावर उपलब्ध करण्यात आलेले होता. परंतु दि 10/11/2020 च्या शासन निर्णयानुसार 100 टक्के अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली.

या योजनेसाठी नविन विहीर खोदणे ही बाब वगळुन योजनेतील अन्य बाबींसाठी किमान 0.20 क्षेत्र ते 6 हे क्षेत्र लागु राहिल म्हणुन या योजनेअंतर्गत लाभार्थींनी लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करावे पंचायत समितीच्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला या ‌ योजनेपासून कोणीही वंचित राहु नये तसेच यामध्ये काही अडचणी आल्यास किंवा अधिकाऱ्यांनी माहिती योग्य न दिल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे माजी सभापती शेखरजी गाडे यांनी नवबौद्ध व अनुसूचित जातीतील लाभार्थीना आव्हान केले.

यावेळी उपस्थित सभापती गहिनीनाथ ननवरे गटविकास अधिकारी खरात , पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, अॅड राहुल सावंत,दत्ता जाधव,स्वाती मुळे, मंदाकिनी लकडे, उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE