उजनी पुनर्वसित गावठाणातील कामे वेळेत होत नसल्याने कंत्राटदारावर कारवाई करा
करमाळा समाचार -संजय साखरे
उजनी प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पुनर्वसित गावठाण केतुर नं 1 केत्तुर नं2 या गावठाणा मधील पुनर्वसन विभागाकडून विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून ही संबंधित ठेकेदारा कडून काम न केल्यामुळे सदर एजन्सी चे नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करा अशी मागणी अशी मागणी करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पाटील यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, उजनी प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पुनर्वसित गावठाण केत्तुर नं 1 व केत्तुर नं 2 या दोन्ही गावठाणांना नागरी सुविधा अंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधणे,काँक्रीटची गटरी बांधणे, गावांतर्गत रस्ते, स्मशानभूमी शेड बांधणे, इत्यादी कामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून एक कोटी 26 लाख रूपयाचा निधी मंजूर असून त्याचे टेंडर सुद्धा झाले आहे.
परंतु संबंधित ठेकेदार व एजन्सी अद्यापपर्यंत काम चालू करण्यास टाळाटाळ करत आहे.वारंवार लेखी व तोंडी सांगूनही संबंधित ठेकेदार टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे. व काम चालू करण्यास टाळाटाळ करत आहे.तरी संबंधित एजन्सी ठेकेदार यांची नावे वेळेत काम चालू न केल्यामुळे ब्लॅक लिस्टमध्ये टाकावीत व संबंधित केत्तुर नं१ व केत्तुर नं2येथील कामांची नवीन टेंडर काढण्यात यावे असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांना पाठवल्या आहेत.
