करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मकाईचे माजी संचालक संतोष आप्पा यांचे निधन ; तालुक्यात हळहळ

करमाळा समाचार

बागल गटाचे समर्थक तसेच मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष आप्पा देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू व हसतमुख अशा स्वभावाचे संतोष देशमुख हे अचानक निघुन गेल्याने पूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरु आहे. बागल गटाला विजय मिळावा यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरु होते. त्यात प्रमुख कामगिरी आप्पा निभावत होते. वांगी परिसरात उत्कृष्ट समाजकार्य करत असलेला नेता म्हणून ओळख निर्माण केलेले संतोष आप्पा देशमुख हे अचानक निघुन जातील असे वाटत नसताना झालेली घटना मनाला चटका लाऊन जाणारी आहे.

जवळपास मकाईत बागल गटाची एकतर्फी सत्ता आलेली असताना ज्या सत्तेसाठी त्यांनी प्रयत्न केले याचा अंतिम निकाल येण्यापूर्वीच त्यांची ही एक्झिट नक्कीच सर्वांना मोठा झटका देणारी ठरणार आहे. हसतमुख सभावाने कायम प्रत्येकाच्या हृदयात घर करणाऱ्या आप्पांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

अंत्यविधी आज दुपारनंतर ठीक 2 वाजता करण्यात होणार आहे .

आमचे सहकारी बंधू, मकाई स.सा.का. चे संचालक मा. संतोष उर्फ बारिकराव देशमुख यांचे आज आकस्मात दुःखद निधन झाले.एका अतिशय धाडसी,कार्यक्षम यूवक सहका-यास आम्ही मुकलो आहोत. देशमुख कूटूंबियांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
स्व.बप्पांच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना..
– रश्मी बागल , बागल गटाच्या नेत्या.

आमचे सहकारी बंधू,मकाई स.सा.का. चे संचालक मा. संतोष उर्फ बारिकराव देशमुख यांचे आज आकस्मात दुःखद निधन झाले.एका अतिशय धाडसी,कार्यक्षम यूवक सहका-यास आम्ही मुकलो आहोत. देशमुख कूटूंबियांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्व.बप्पांच्या आत्म्यास शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना..
– सवितादेवी राजेभोसले, मा. जिल्हा परिषद सदस्या.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE