करमाळ्यात मॉडर्न फिटनेस जिममद्ये तालुकास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा
करमाळा –
करमाळा येथे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेट लिफ्टिंग च्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत तालुक्यातील 50 पेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदवला होता यावेळी विजेत्या स्पर्धकांना गोल्ड सिल्वर व ब्रांच पदके देऊन सन्मानित करण्यात आले सदरच्या स्पर्धांचे आयोजन करमाळा येथील मॉडर्न जिम कडून करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आपण पाच हजार स्क्वेअर फुट मध्ये आधुनिक सर्वात स्वस्त जीम उभा करण्याचा मानस असल्याचे मॉडर्न जीम चे प्रमुख नवाज शेख यांनी बोलुन दाखवला.
येथील मॉडर्न जिमच्या बक्षीस वितरणाप्रसंगी बोरगावचे सरपंच विनय ननवरे, मनसे तालुका अध्यक्ष संजय घोलप, डॉ. सुहास कुलकर्णी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, सावंत गटाचे गणेश सावंत, पत्रकार विशाल घोलप, सामाजिक कार्यकर्ते नाना लावंड, विशाल गुळवे, सुरज ढाणे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय घोलप म्हणाले, युवकांनी अतिशय कष्टाने परिश्रम घेऊन शरीर बनवणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वतः मेहनत करून शरीरयष्टी बनवली तरच ती टिकून राहते. त्यामुळे जिम मध्ये सराव करीत असताना कष्ट घेणारेच पुढे जातील. औषधांचा वापर करून शरीरयष्टीचा फायदा होत नाही. मॉडर्न जिमने मुलांना चांगले व्यासपीठ उभा करून युवकांसाठी उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशिक्षक योगेश ढाणे यांनी केले.
विजेते …
डेड लिफ्ट
पहिला गट (५० ते ६० किलो वजनगट)
प्रथम रोहन मोरे १३५ किलो, द्वितीय फैजान शेख १२० किलो, तृतीय श्रेयस खराडे १२० किलो
दुसरा गट ६० ते ७५ किलो वजनगट
प्रथम जय खडके १६० किलो, द्वितीय बासिद शिकलकर १५५ किलो, तृतीय अमन शेख १४५ किलो
खुला गट ७५ किलो पुढील
प्रथम राज सुर्यवंशी १६५ किलो, अतुल लष्कर १६५ किलो, कृष्णा पवार १५५ किलो
बेंच प्रेस
पहिला गट ५० ते ६० किलो
प्रथम यश माहुले ६० किलो, द्वितीय रोहन मोरे ५५ किलो, फैजान शेख ५५ किलो,
दुसरा गट ६० ते ७५ किलो वजनगट
प्रथम ऋषी शेळके १०० किलो, अर्जन भांडवलकर ९५ किलो, साहिल कांबळे ७५ किलो
खुला गट ७५ किलो वजनगट
प्रथम अतुल लष्कर १०५ किलो, कृष्णा पवार १०० किलो, हिरामन कौले ९५ किलो
स्कॉट
पहिला गट ५० ते ६० किलो
यश माहुले ८० किलो, राहुल बनकर ८० किलो, रोहन मोरे ७५ किलो
दुसरा गट ६० ते ७५
ऋषी शेळके ११५ किलो, जय खडके ९५ किलो, गणेश कांबळे ९० किलो,
खुला गट ७५ किलो पुढे
साहील रोडे १२५ किलो, कृष्णा पवार १२० किलो, अतुल लष्कर १०५ किलो.