शिवक्रांती स्पोर्ट क्लब च्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
करमाळा समाचार – karmala samachar
करमाळा तालुका येथील शिवक्रांती (shivakranti) स्पोर्ट क्लब यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या क्रिकेट स्पर्धेचे पहिले पारितोषिक 31 हजार रुपये असणार आहे. हे सामने 16 जानेवारीपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयच्या क्रीडांगणावर खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर(vilasrao ghumare), उद्योजक भारत अवताडे(bharat aavatade), टायगर ग्रुप अध्यक्ष तानाजी जाधव( tanaji jadhav) , भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे( ganesh chivate), माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे(prashant dhale), संतोष जाधव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संतोष वारे(santosh vare), देवळाली सरपंच आशिष गायकवाड, अभिजीत पाटील, अरुण काका जगताप, मनसे तालुका अध्यक्ष संजय घोलप(sanjay gholap), मंगेश गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 31 हजार रुपये भारत आवताडे यांच्यावतीने तर द्वितीय पारितोषिक तानाजी जाधव व बालाजी चांदगुडे यांच्यावतीने 21 हजार रुपये तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये प्रशांत ढाळे तर चतुर्थ पारितोषिक सात हजार रुपये संतोष वारे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम चषक माही डेकोरेशनचे मंगेश गोडसे, द्वितीय चषक कै. नानासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ, तृतीय चषक अभिजीत पाटील उपसरपंच तरडगाव त्याच्यावतीने तर चतुर्थ चषक कल्याण भाऊ गायकवाड यांच्या स्मरणात देण्यात येणार आहे.
सदरची स्पर्धा तालुका अंतर्गत असल्याने तालुक्यात खेळाडूंना संधी नसणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व तुल्यबळ संघांमध्ये या ठिकाणी स्पर्धा बघायला मिळेल. नाव नोंदवण्यासाठी अझर जमादार, विजय तरंगे, विलास धायतोंडे, अभिषेक शेलार यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.