करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शासकीय कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करुन पैसे उकाळणाऱ्याला पोलिसांनी पकडले ; करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा समाचार (karmala samachar)

करमाळ्यात karmala तालुक्यातील एक महसूल चे कर्मचारी (तलाठी) यांना कार्यालयात कामकाज करीत असताना दाखल्याचे पैसे घेतल्याने एकाने व्हिडिओ काढल्याचे सांगुन सतत ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करत होता. त्यास करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे (jotiram gunjavate)यांनी सापळा रचून पकडले आहे पुढील कारवाई सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  तलाठी श्री काळे हे कार्यालयात कामकाज करीत असताना उताऱ्यासाठी फी घेताना एकाने त्यांची मोबाईल मध्ये शूटिंग काढली असे तो सांगत होता व शूटिंग दाखवण्याची भिती दाखवत पैशाची मागणी करू लागला.

हा सर्व प्रकार श्री काळे यांनी आपल्या वरिष्ठांना सांगितला व वरिष्ठांनी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी करमाळा पोलीस ठाण्याचे डीबी पथक त्या मार्गावर पाठवले. दिलेल्या माहितीनुसार देवीचा माळ रस्त्याला पैसे देण्याचे ठरले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला व संबंधिताला ताब्यात घेतले आहे.

सदरचा व्यक्ती हा खांबेवाडी परिसरातील असून त्याच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. पोलिस हवालदार श्री उबाळे, श्री जगताप, श्री शिंदे, श्री. ताकभाते यांचे पथकाने सदरचे कारवाई केली होती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE